मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस ६ कोटी ११ लाख नफा
सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांची माहिती
पुणे :मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेस चालू आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.
बँकेची ८६ वी सर्वसाधारण सभा आझम कँम्पस असेंब्ली हॉल येथे रविवार दि. १६ सप्टेबर रोजी सकाळी साडेदहा वाजता झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.
बॅंकेकडे ५६७ कोटी ६० लाख रुपये ठेवी असून ३४५ कोटी ७२ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. बँकेचा एन.पी. ए.८.४५ टक्के आहे. १९१७-१८ या आर्थिक वर्षात ६ कोटी ११ लाख रुपये फायदा झाला आहे.
पुण्यात मुख्यालय असलेल्या मुस्लीम को- ऑप बँकेच्या २७ शाखा असून २४ शाखाच्या विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे.
मोबाईल बँकिंग अॅप, आरटीजीएस- एनईएफटी गो लाईव्ह या डिजीटल बँकिंग सेवा देण्यात आल्या असून भावी काळात नेट बँकिंग, परकिय चलन विनिमय सेवा दिल्या जाणार आहेत.
बँकेचे संचालक, सभासद,कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते, सभेनंतर ‘ सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम ‘ घेण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार ,सचिव डॉ.हारुन सय्यद यांनी अहवाल मांडला . त्याला सभासदांनी मंजुरी दिली.