आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनामध्ये मराठी समुदायाने हिरीरीने भाग घ्यावा : हेमंत रायकर
‘सिनर्जी ‘ संवाद कार्यक्रमात हेमंत रायकर यांचा सत्कार
पुणे :‘आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनाच्यानिमित्ताने मराठी कला, संस्कृती, सामूहिक कर्तृत्वाचा परिचय घडून येत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्या मराठी संमेलनांमध्ये मराठी समुदायाने हिरीरीने भाग घ्यावा,’ असे आवाहन ‘श्री दीपलक्ष्मी’ इंटरनॅशनल विशेषांकाचे संपादक आणि आगामी युरोपियन मराठी संमेलन संयोजन मंडळाचे प्रतिनिधी हेमंत रायकर यांनी केले.
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, ‘सिनर्जी फाऊंडेशन’ आयोजित ‘सिनर्जी संवाद’ उपक्रमात पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ हे ‘न्यू कॅसल (इंग्लंड) येथे होणार्या युरोपियन मराठी संमेलनाचे सहप्रायोजकत्व स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रकाशन क्षेत्रातील ‘श्री दीपलक्ष्मी ‘ च्या ७२ वर्षाच्या योगदानानिमित्त आणि ११ आंतरराष्ट्रीय संमेलनांना उपस्थित राहणाऱ्या हेमंत रायकर यांचा सत्कार ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ च्या वतीने करण्यात आला. तर युरोपियन मराठी संमेलनाचे निमंत्रण पत्र हेमंत रायकर यांनी ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव यांना सुपूर्द केले. मकरंद केळकर यावेळी उपस्थित होते.
यावेळी हेमंत रायकर यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळचे द्वै वार्षिक युरोपिअन मराठी मराठी संमेलन २९ जून ते १ जुलै २०१८ दरम्यान ‘न्यू कॅसल (इंग्लंड) येथे होणार आहे.
हेमंत रायकर यांनी दोन दशकातील आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनांचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक शिस्तबद्ध संमेलने होतात. तेथील मराठी बांधव वेळात-वेळ काढून संमेलनाची जबाबदारी घेतात, यथस्वी करून दाखवतात. या निमित्ताने मराठी संस्कृतीचा गजर आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो आणि महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मराठी बांधवांमध्ये संवादाचे पूल बांधले जातात. पुस्तकांची विक्री होते . लेखक ,कलाकारांच्या भेटी होतात . त्यामुळे मराठी समुदायाने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये हिरीरीने भाग घेतला पाहिजे.
दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.
शनिवारी दुपारी हा कार्यक्रम एरंडवणे येथील ‘सिनर्जी’ सभागृहात झाला. यापूर्वी ‘सिनर्जी संवाद ‘ कार्यक्रमाला,डॉ.सतीश देसाई याना निमंत्रित करण्यात आले होते .
युरोपिअन मराठी संमेलन बाबत
यावेळचे द्वैवार्षिक युरोपिअन मराठी आंतरराष्ट्रीय मराठी संमेलन 29 जून ते 1 जुलै 2018 दरम्यान ‘न्यू कॅसल (इंग्लंड) येथे होणार आहे. मराठी संस्कृती आणि मराठी भाषा जतन करणे हा या संमेलनाचा प्रमुख हेतू आहे. संमेलनामध्ये महाराष्ट्रातील विविध मराठी साहित्य, कविता, नाटक, सिनेमा यांचे प्रदर्शन भरविण्यात येते. या वर्षी प्रवीण दवणे, सुबोध भावे इत्यादी मान्यवर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत