पुणे :पुणेरी वाडा सर्व पुरातन वैशिष्टयांसह उभारुन यशस्वी पर्यटन प्रकल्प साकारणाऱ्या ‘ ढेपेवाडा ‘ प्रकल्पास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेचा पारंपारिक संस्कृती विभागातील उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कृषी पर्यटन विकास संस्थेमार्फत जागतिक कृषी दिनानिमित्त एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदे दरम्यान महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रांना गौरविण्यात आले. यामध्ये पुण्यातील ढेपे वाड्याचा समावेश होता.
हा कर्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मुंबई येथे बुधवारी झाला.ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी मंत्री पांडुरंग खोत यांच्या हस्ते व कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारे आबा तावरे आणि पांडुरंग तावरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण पार पडले.
पर्यटन मंत्री जयकुमार रावल, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष भगवानराव तावरे, कार्यक्रमाचे संयोजक पांडुरंग तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
पश्चिम महाराष्ट्रातून पारंपरिक आणि संस्कृती वारसा या प्रभागातील उत्कृष्ठ प्रकल्प म्हणून ‘ढेपेवाडयाचा’ गौरव करण्यात आला.ढेपेवाडा (जि. पुणे) हा मुळशी तालुक्यातील गिरीवन येथील पर्यटन प्रकल्प असून नामशेष होऊ पाहणारा पुणेरी वाडा तेथे सर्व पुरातन वैशिष्टयांसह उभारण्यात आला आहे.