‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या 35 प्रतिनिधींचा सहभाग
पुणे : ‘अमेरिकन कॉन्स्युलेट’ आणि ‘युनायटेड स्टेट एज्युकेशनल फाऊंडेशन इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी आयोजित ही एक दिवसीय कार्यशाळा गुरूवारी हॉटेल प्राईड येथे पार पडली.
कार्यशाळेमध्ये पुणे, सांगली, औरंगाबाद मधील शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे 35 प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये ‘अवंता फाऊंडेशन’, ‘येरळा वाणी’, ‘अलोचना’, ‘जल बिरादरी’, ‘आस्था फाऊंडेशन’, ‘मशाल’, ‘फ्युएल’, ‘एमकेसीएल’ या संस्थांचा समावेश होता.
बहुमाध्यम (मल्टी मीडिया) तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. बाळकृष्ण दामले यांनी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये एम. एस. (अमेरिका) केले आहे. ते ‘फुलब्राइट स्कॉलर’ असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील ‘एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’ मध्ये कार्यरत आहेत.
कार्यशाळेची सुरूवात जोनाथन हवांग (सहाय्यक सांस्कृतिक कार्य अधिकारी, अमेरिकन कॉन्स्युलेट, मुंबई) यांनी केली. सुरंजना दास (कार्यक्रम व्यवस्थापक, युनायटेड स्टेट एज्युकेशनल फाऊंडेशन इंडिया) यांनी स्वागत केले. बाळकृष्ण दामले यांनी ‘डिजिटल स्टोरी टेलिंग टुल्स अॅण्ड टेक्नीक्स’ या विषयी मार्गदर्शन केले.