पुणे ःसंगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना कलागौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. भारतीय पत्रकार संघ, कृतिका बहुद्देशीय संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
नासिक येथे ११ मार्च रोजी कुसुमाग्रज स्मारक सभागृह येथे सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या हस्ते र्हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
‘युवक मंडळी संगीत विषयात आणि या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांवर अभ्यास करून लिखाण करतात. हे उल्लेखनीय आहे’, असे गौैरी सावंत यांनी भाषणात सांगितले.
पालकमंत्री गिरीश महाजन, हेमंत टकले, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, सुधीर वाघोलीकर, अनु वाघोलीकर, संजय लोणारी, आशय वाघोलीकर यावेळी उपस्थित होते.
-हीदम वाघोलीकर आणि रचना खडीकर -शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. रचना खडीकर -शहा या लता मंगेशकर यांची भाची आहेत.लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ ( इंडियन हार्प ) आकारात प्रकाशित होत आहे.