टीका करणारे जेव्हा समोर समोर आले ….
पुणे-
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास जोर धरलेला असताना ,राजकारणातले विरोधक आरोप प्रत्यारोपाचा मारा एकमेकांवर किंवा एकमेकांच्या विचारावर ,पक्षांवर ,नेत्यांवर करत असताना …प्रचाराच्या रणधुमाळीत असा एखादा क्षण येतो ..क्षणभर ..हे जुने मित्र ..एकमेकासमोर उभे ठाकतात ..आणि प्रचारातील ..ओकलेली गरळ..विसरून प्रेमाने,स्नेहाने कसा एकमेका नमस्कार करतात याचे अनोखे चित्र आज आंबेडकर जयंती च्या निमित्ताने दिसून आले.
भाजप आणि कॉंग्रेस आघाडी असे दोन्ही उमेदवार आज आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते .. वेगवेगळ्या वेळी जरी ते तिथे गेले ..तरी येता जाता त्यांच्या अशा गाठी पडल्या .. तो क्षण अनेकांनी फोटोत टिपण्याचा प्रयत्न केला . महापौर मुकता टिळक आणि कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या छायाचित्रात एकमेकांना नमस्कार करताना दिसत आहेत तर ज्यांची राजकारणात घट्ट मैत्री आहे कि खरोखर प्रखर विरोधक आहेत यावर ज्यांच्या बाबत नेहमी अनेकांना प्रश्न पडतो ते महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि कॉंग्रेसचे गट नेते अरविंद शिंदे क्षण भर तरी अशा खेळीमेळी च्या वातावरणात दिसले ..आंबेडकर जयंतीचा हा करिष्मा कॅमेऱ्यात टिपायला अनेकांनी लगबग केली .