पुणे : पुण्याच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी केलेल्या ६७ कोटीच्या तरतुदीतून ७ कोटी रुपये पीएमपीएमएल च्या कामांसाठी सहमतीने वळविण्यात आले मात्र या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बराच वेळ राजकीय कलगीतुरा रंगला. झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच यादरम्यान झडल्या.उपमहापौर मुकारी अलगुडे यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी होते .
कर्वे रोड,पौड रोड ,न ता वाडी , वेईकाल डेपो पीएमपी आगारांतील पायाभूत सुविधांमध्ये वाढ; आगारांची नव्याने उभारणी करायची आहे. त्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी मिळावा, असा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सादर केला होता. सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिली.
मेट्रोसाठी तरतूद केलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. त्याला काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता; परंतु मेट्रोसाठी वापरली न जाणारी तरतूद यासाठी वापरण्यात येणार असून, मेट्रोला मंजुरी मिळाल्यावर त्यासाठीचा निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे, असे आयुक्तांनी स्थायी समितीमध्ये स्पष्ट केले होते. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी देताना कॉंग्रेसचे अरविंद शिंदे सभागृहनेते बंडू केमसे आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी राजकीय धुळवड रंगविली .पहा आणि ऐका हि नेमकी कशी होती ..