पुणे : ‘अच्छे दिन आयो रे भैय्या , हो मैय्या ..आयोरे …’.चा नारा पुणे महापालिकेतील स्थायी समितीच्या च्या जागा निवडल्यानंतर भाजपमधील इच्छुक होते ,अशांना आता हताश होवून मनातल्या मनात गुणगुनावा लागतो आहे .महापालिकेच्या स्थायी समितीचे नवे सदस्य निवडताना भारतीय जनता पक्षाने दोन आमदारांच्या घरात पदे दिल्याने पक्षाने आमदारांच्या घरातच महापालिकेच्या स्थायी समितीची खिरापत वाटल्याने हे नैराश्य आज अनेक इच्छुकांना आले होते . तर कॉंग्रेस मध्ये सत्ताधाऱ्यांशी दोन हात करणारा खमक्या चेहरा न देता नवा चेहरा दिल्याने भाजपच्या वरिष्ठ गोटात समाधान होते .
स्थायी समिती मध्ये चार जागांवर निवड घोषित होताच , भाजपची पालिकेत सत्ता असल्याने या पक्षातील जुन्या-नव्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा मोठा उमटला . आणि धुसफूस व पक्षांतर्गंत सुंदोपसुंदीसुरु होणार काय ? असा प्रश्न उपस्थित झाला .या चारपैकी दोघेजण महापालिका निवडणुकीच्या आधी इतर राजकीय पक्षातून भाजपमध्ये आले असून तरीही त्यांना एवढ्या कमी वेळेत संधी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी गाऱ्हाणी मांडण्यास सुरवता केली आहे. “अशा लोकांना संधी दिली, मग ज्यांनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षाचे स्वयंसेवक म्हणून काम केले, त्यांचा आता विसर पडला का, ‘ असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
स्थायी समितीतून भाजपचे चार सदस्य निवृत्त झाल्याने या पदासाठी पक्षातील दोन डझन सदस्य इच्छुक होते. त्यातील अनुभवी आणि एका नव्या सदस्यांच्या नावाचा विचार होईल, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली, मात्र आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश आणि आमदार योगेश टिळेकर यांच्या मातुःश्री आणि ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांना संधी देण्यात आली. यांच्यासह पहिल्यांदाच निवडून आलेले दिलीप वेडे-पाटील आणि उमेश गायकवाड यांना संधी देण्यात आली. हे नवोदित असल्याने त्यांना संधी दिल्याबद्दल तक्रारीचा सूर नाही पण यापैकी दोन जागा आमदारांच्या घरात गेल्याने अन्य इच्छुकांनी उघडपणे नाराजी मांडली.
मुळीक हे दुसऱ्यांना निवडून आले असून, आधी म्हणजे, गेल्या पाच वर्षात ते दोनदा स्थायीचे सदस्य होते. तर, टिळेकर याआधीही निवडून आल्या होत्या. भाजपकडे बहुतांशी सदस्य नवखे असल्याने स्थायी समितीत अनुभवी सदस्यांना संधी देण्याची मागणी पक्षातील एका गटाने लावून धरली होती. तर, आगामी निवडणुका लक्षात घेऊन ज्या भागात पक्षाची ताकद कमी आहे, त्या भागातील सदस्यांना स्थायीत स्थान मिळेल, असेही सांगण्यात येत होते. पण, दोघा आमदारांच्या घरात आणि दोन नव्या सदस्यांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.