कलमाडींचा फेस्टिव्हल झाला ;आता भाजपचा ग्लोबल गणेशोत्सव
पुणे- पुण्यात पहिल्यांदाच भाजपचा प्रचंड बहुमताने पालिकेवर झेंडा फडकल्याने याचा आनंद आता पुण्याच्या गणेश उत्सवातूनही झळकणार आहे . अर्थात उत्सवाचे १२५ वे वर्ष आहे असे सांगितले जाते आहेच .पण एकंदरीत या सोहळ्यासाठी यंदा प्रथमच 2 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले जाणार असल्याने प्रत्येक पुणेकरांच्या स्मरणात राहील असा उत्सव व्हावा अशी अटकळ बांधून त्याचे नियोजन करण्यात येवू लागले आहे .
पुण्याच्या गणेश उत्सवाला आता ब्रँँड अॅम्बेसिडर लाभणार आहे . या साठी बिग बी अमिताभ बच्चन पासून ते सचिन तेंडूलकर पर्यंत काहींना संपर्क साधण्यात आला आहे . पण जोपर्यंत सारे काही निश्चित होत नाही तोपर्यंत याबाबत वाच्यता करायची नाही असेही ठरले आहे . दरम्यान तेंडूलकरांचा विषय आज महापौरांशी बोलताना निघालाच . पण तेंडूलकर ने मात्र अद्याप मंत्र्यांच्या पत्राला उत्तर दिलेले नाही , बच्चन जी यांचे अद्याप काही समजले नाही .. पण या दोघांपैकी कोणी तरी 1
ब्रँँड अॅम्बेसिडर करण्यासाठी मुंबईतील मंत्रालयाच्या पातळीवरून हालचाली करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे .
या उत्सवात वादग्रस्त ठरू शकेल अशा 5 हजार ढोल वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे वृत्त आहे . अगोदरच नदीपात्रातील सरावाने त्रस्त होणाऱ्या पुणेकरांना आता 5 हजार ढोलवादनाच्या आवाजाला सामोरे जाण्याची मानसिकता तयार करावी लागणार आहे . त्याला इलाज नाही उत्सव आहे .उत्साहात व्हायला हवा . पण ढोल वादनाचे सर्वोच्च रेकोर्ड पुण्याच्याच नावावर असताना आता आणखी हा अट्टाहास कशासाठी आणि कुणासाठी ? याच्याव्यात्रिक्त आणखी काही वेगळे सर्वांना रुचेल असे काही करता येणार नाही काय ? असे हि प्रश्न विचारले जावू लागले आहे .