पुणे- प्रत्येकवेळी राजकारण करून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचे, त्यांना काम करताना हैराण करून सोडायचे हाच यांचा धंदा असा आरोप विरोधकांवर करणाऱ्या भाजपने या ‘कथित’राजकारणावर आज स्वतः च कडी करत विरोधकांची कशी मुस्कटदाबी करत त्यांचा आवाज दाबून टाकला….
महापालिकेच्या महत्वाकांक्षी 24 तास पाणी योजनेसाठी पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या 200 कोटीच्या कर्जरोख्याची नोंदणी मुंबई शेअरबाजारात करण्यात आली असून ही ऐतिहासिक बाब असल्याचे सांगत सभागृह नेते भाजपचे श्रीनाथ भिमाले यांनी अभिनंदन करणारी सभा तहकुबी मांडली. पुणेकर कर्जबाजारी झाले यात अभिनंदन कसले, आमचा विरोध आहे ,आम्हाला तहकुबीवर बोलायचे आहे असा आरडाओरडा विरोधकांनी केला .पण त्यांना बोलायची परवानगी न देताच हि सभा गुंडाळण्यात आल्याने विरोधकांनी घटनेची पायमल्ली करणारे कामकाज करता हे बरोबर नाही असे सांगत पुन्हा एकदा महापौरांचा निषेध करत सभात्याग केला … अखे सभागृहात फक्त भाजपचेच सदस्य उरले … नंतर त्यांनी हि पुढे असलेल्या आणखी दोन सभा कामकाज न करताच तहकूब करून टाकल्या … पहा थेट जसाच्या तसा व्हिडीओ….