पुणे- नेहमीच सभागृहात अत्यंत शांत राहणाऱ्या ‘त्या’ महिलांनी आज सभागृहात रोल बदलला .. चक्क सभागृह गाजवून सोडलं.. ..
सभेच्या वेळी इकडं तिकडं बघून कारभार : झापडं लावा यांना ‘ बैला सारखी … अशी नगरसचिव यांच्यावर तत्कालीन पक्षनेत्या शीतल उगले यांनी केलेली कोटी ,नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या: ‘आयुक्तां’च्या अँटीचेंबरवर त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या तथाकथित अधिकारी बनलेल्या आबा बागुलांची सभागृहातून उचलबांगडी होणे अशा प्रसंगांनी आज महापालिकेतील उल्टा पुल्टा सभा गाजली ..
बहुसंख्य पत्रकारांचा सहभाग , सभागृह नेते बनलेले नगरसचिव आणि पक्षनेत्या बनलेल्या दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांचा जोश पाहून महापौर बनलेले आयुक्त …. आणि आयुक्त बनलेल्या महापौरही
या विनोदी वातावरणात काही भाष्य करण्याचा मोह टाळू शकले नाहीत . सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची भूमिका जोरदार पणे वठवताना नगरसचिव सुनील पारखी यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक बनलेल्या पत्रकारांनी तेवढ्याच जोरदारपणे साथ दिली . विरोधी आणि सत्ताधारी यांच्यातील सभागृहातील हालचाली दाखविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना जोरदार हशाने दाद मिळाली .तर नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणे, आयुक्तांचे न ऐकणे .. अशा अधिकाऱ्याची कशी उचलबांगडी होते ….ते आपल्या आयत्यावेळेच्या कृत्याने आबा बागुल यांनी दाखवून दिले . त्यातच’ त्यांनी ‘आयुक्त ‘ बनलेल्या महापौरांना तुम्ही सारख्याच अँटी चेंबर मध्ये असता असा टोला लगावून सभागृहात हशा पिकविला
अधिकारी बनलेले सभागृह नेते भिमाले , सुरक्षा अधिकारी बनलेले वसंत मोरे , नगरअभियंता बनलेले विरोधी पक्षनेते चेतन तुपे आदींनी आपापल्या भूमिका पार पाडल्या .. पण एकूणच बाजी मारली दोन महिला अतिरिक्त आयुक्त ज्या पक्ष नेत्या बनल्या होत्या त्यांनी .. आणि सभागृह नेता बनलेल्या नगरसचिव पारखी यांनी …. पहा एक झलक