पुणे : महापालिका शाळेत शेकडो शिक्षक अवघ्या सहा महिन्यांच्या कंत्राटावर ,अवघ्या 10 हजार रुपये दरमहा पगारावर काम करीत आहेत .अशा शिक्षकांनी नुकतेच महापालिकेसमोर आंदोलन केले . अखेरीस त्यांच्या मागण्या उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्तांपर्यंत पोहोचविल्या आणि त्यांच्या पगारात वाढ करण्यास तात्विक मान्यता घेतली आहे . आता स्थायी समिती पुढे त्यांच्या पगार वाढीचा विषय पुढील आठवड्यात येईल असा विश्वास डॉ . धेंडे यांनी व्यक्त केला आहे .
पहा आणि ऐका …नेमकं उपमहापौर डॉ धेंडे यांनी याबाबत काय म्हटले आहे …