पुणे-अधिकाऱ्यांनी कसे वागावे याबाबत जशी आचारसंहिता आहे तशी आचार संहिता लोकप्रतिनिधींना देखील घालून दिली पाहिजे असे मत महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी येथे मांडले .
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकाराचा त्यांनी निषेध नोंदविला . अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेत ते बोलत होते .