पुणे-धनकवडीतील क्रांतिसूर्य म. फुले चौकातील सुशोभीकरणात सायकल मार्गाचा समावेश असला तरी… आणि कोणत्याही सुशोभीकरणासाठी पूर्वी असलेल्या चौकातील दुभाजकाची जागा वाढवलीजाणार नसल्याने या चौकाची , आणि वर्तुळाची प्रत्यक्षात असलेल्या वाहतुकीसाठीच्या जागेची रुंदी अजिबात कमी होणार नाही असा दावा या कामासाठी पुढाकार घेतलेले या भागातील भाजपचे नगरसेवक महेश वाबळे यांनी केला आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
या चौकात अनेक वाहने लागत त्यावर अनेकदा चर्चा झाली कारवाई झाली मात्र हे कारण नसल्याचे सांगून वाबळे म्हणाले ५० लाख रुपये खर्च करून येथे अनेक कामे होतील आणि हा चौक अत्यंत सुंदर दिसेल .. तो कसा दिसेल ..हे दाखविणारी संकल्पित छायाचित्रे त्यांनी दिली .. पहा आणि ऐका नेमके वाबळे यांनी काय म्हटले आहे .