पुणे-सारी पुण्यनगरी श्रीगणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असताना गणेशाच्या आगमनासमयी बाप्पांच्या दर्शनासाठी आतुर झालेली असताना … ज्यांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप बहाल केले ..यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्या लोकमान्यांच्या टिळक घराण्यातील मुक्ता टिळक ..यांनी महापौर असताना ..महापौर या पदाच्या परंपरेलाच छेद देण्याचा प्रयत्न केला आहे . गेल्या वर्षी त्यांच्यावर भाऊ रंगारी गणेशाच्या मिरवणुकीचे सारथ्य केले नाही असा त्यांच्यावर आरोप झाला . आणि यंदा तर त्या श्रीगणेशाच्या आगमन प्रसंगी पुण्यातच थांबल्या नाहीत . मात्र थेट सॅन फ्रांसिस्कोहून फेस बुक पेज वरून त्यांनी बाप्पांचे स्वागत केले… आणि पुणेकरांना शुभेच्छ्या दिल्या आहेत ….त्यांच्या अशा कार्यपद्धतीमागील कारणे पाहिली तर ती देखील मोठ्ठी गमतीदार असल्याचे दिसते आहे . चक्क ‘क्लायमेट अँड क्लीन एअर अवॉर्ड २०१८’ या सॅन फ्रांसिस्को येथील 11 तारखेच्या कार्यक्रमात पुणे महापालिकेला देण्यात येणारा ‘मोस्ट इनोवेटिंग पॉलिसी अवॉर्ड’ हा पुरस्कार स्वीकारायला त्या आपले सहकारी पदाधिकारी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सभागृह नेते यांच्या समवेत परदेश्वारीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे .या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिथे पाठवून त्या स्वतः गणेशाच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकत नव्हत्या काय ? असा प्रश्न त्यामुळे विचारला जाऊ लागला आहे .
प्रती वर्षी गणेशाच्या आगमनाला आणि निरोप देताना महापौर या पुण्यातील प्रथम नागरिक म्हणून त्यांच्या उपस्थितीत गणेशाचे स्वागत केले जाते आणि निरोप हि दिला जातो .प्रत्येक वर्षी प्रत्येक महापौरांनी हि परंपरा पाळली आहे . पण गेल्या वर्षी टिळक महापौर झाल्या आणि वादंगाला प्रारंभ झाला . भाऊ रंगारी गणेश मंडळापासून हा वाद सुरु झाला शनवार वाड्यावर महापौरांनी गेल्या वर्षी या उत्सवाचे ढोल तर वाजविले पण या उत्सवात पूर्ण करू अशी जाहीर घोषणा केले आपले अनेक मनसुबे कमकुवत कारकीर्दीमुळे त्या पूर्ण करू शकल्या नाहीत . आता तर या वर्षी त्या भारतातच नाहीत . जर गणपती १३ तारखेला येणार हे ठाऊक होते तर त्यांनी १३ तारखेला पुण्यात गणपती च्या स्वागता साठी टिळक म्हणून नव्हे तर महापौर म्हणून उपस्थित रहाणे अत्यावश्यक नव्हते काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे .
पुण्याला तिथे मिळालेला अवार्ड हा चर्चेचा च विषय आहे . अशा अवार्ड साठी गणेशाच्या स्वागताची जबाबदारी सोडून महापौरांनी जाणे हे अनेकांना रुचलेले नाही पण तरीही ‘खामोश’ मात्र आहेत .