पुणे – महापालिकेतील सहा उपायुक्त आणि १६ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या आयुक्त कुणाल कुमार यांनी केल्या.आणखी सात विभागप्रमुखांच्या बदल्या ते करणार असल्याचे वृत्त आहे .
उपायुक्त विजय दहिभाते यांची परिमंडळ एकमध्ये (नगररोड-वडगाव शेरी, येरवडा-कळस-धानोरी, ढोले पाटील) तर, सुनील केसरी यांची परिमंडळ तीनमध्ये (धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर) बदली झाली आहे. विलास कानडे यांच्याकडे परिमंडळ दोनमध्ये (औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता, कोथरूड-बावधन) नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे टेंडर सेल, बीओटी सेल, उपायुक्त विशेष आणि आकाशचिन्ह विभागाचाही कार्यभार सोपविला आहे.
ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे परिमंडळ चारमध्ये (हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, कोंढवा-येवलेवाडी), सुरेश जगताप यांच्याकडे परिमंडळ पाचमध्ये (कसबा-विश्रामबागवाडा,भवानी पेठ, बिबवेवाडी) नियुक्ती
दिली आहे. सतीश कुलकर्णी यांच्याकडे मालमत्ता व व्यवस्थापन विभागासह उपआयुक्त भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचाही कार्यभार सोपविला आहे.
सहाय्यक आयुक्त जयंतकुमार भोसेकर यांची कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयात, नितीन उदास यांची कोंढवा-येवलेवाडी, विजय लांडगे यांची येरवडा-कळस-धानोरी, अविनाश संकपाळ यांची बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, रवी पवार यांची शिवाजीनगर-घोले रस्ता, संदीप कदम यांची औंध-बाणेर, युनूस पठाण यांची धनकवडी-सहकारनगर, माधव देशपांडे यांची कसबा-विश्रामबागवाडा, संध्या गागरे यांची हडपसर-मुंढवा,
सुनील गायकवाड यांची भवानी पेठ, वसंत पाटील यांची नगर रस्ता (वडगाव शेरी), उमेश माळी यांची सिंहगड रस्ता, संजय गावडे यांची वानवडी-रामटेकडी, अरुण खिलारी यांची ढोले पाटील तर गणेश सोनुने यांची वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात बदली झाली आहे. ॲलिस पोरे यांची घनकचरा व्यवस्थापन विभागात नियुक्ती झाली आहे.