पुणे- पीएमआरडीए-पालिकेचा गळा दाबत असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची तोंडंं शिवलीत काय ? असा सवाल महापालिकेतील विरोधीपक्षनेते चेतन तुपे यांनी केला आहे . मेट्रो मार्गा लगत ५०० मीटर परिसरातील बांधकाम विकसन परवानग्या आणि शुल्क वसुलीचे अधिकार स्वतः कडे मागून पीएमआरडीए महापालिकेचा आर्थिक दृष्ट्या गळा दाबु पाहत असल्याचा आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी आज केला याप्रकरणी त्यांनी पीएमआरडीएला तर खडसावलेच पण त्याबरोबर पुण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपच्या आठ आमदार आणि खासदार यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा हि धिक्कार केला आहे …. पहा नेमके तुपे यांनी काय म्हटले आहे ….