पुणे- तुकाराम मुंडे ,प्रेरणा देशभ्रतार ,सुहास मापारी ,सतीश कुलकर्णी अशा अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतून झाल्या . कॉंग्रेस राष्ट्रवादीने या संदर्भात कधीही आक्षेप घेतला नाही .पण आता अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांच्याबाबत मात्र कर्मचाऱ्यांची आंदोलने होत असताना …उगले यांच्याकडील अनेक खात्यांच्या कार्यभारा पैकी काही खात्यांचा कारभार आयुक्तांनी काढून घेतल्यानंतर मात्र …आयुक्तसाहेब माकडांच्या तालावर नाचू नका ‘ असे वक्तव्य करत उगले यांच्या पाठीशी ठाम उभे राहून पालिकेतील प्रामाणिक अधिकाऱ्यांचा छळ होऊ देणार नाही, असा इशारा पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी दिला आहे .
गेली काही महिने उगले यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजावर आक्षेप घेत त्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांची आंदोलने करण्यात आली .आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत गाऱ्हाणी गेली .अखेरीस त्यांच्या कडील बांधकाम ,अतिक्रमण निर्मुलन अशी खाती काढून घेण्यात आली …
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची मात्र यावेळी सत्ताधारी भाजपला उगले प्रकरणी तरी जेरीस आणण्याचे डावपेच खेळले जात आहेत .
या प्रकरणी आज पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे पाटील यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे …..