पुणे- शहराचे मांगल्य,वाहिन्या मानल्या जाणाऱ्या मुळा मुठा नदीवर भर दिवसा लक्ख उजेडात दरोडा घाण्याचे काम सुरु असल्याचा प्रकार उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी आज चव्हाट्यावर आणला आहे . आणि नदीचे गळे घोटणाऱ्या चोरांवर कडक कारवीची मागणी केली आहे. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर मी न्यायालयात जाईल अशी तंबी हि त्यांनी दिली आहे .
खुद्द उपमहापौर धेंडे यांनी या प्रकरणी लेखी तक्रर महापालिका आयुक्तांकडे केली आहे , नदी पात्रात भराव टाकून ती बुजवून तिथे भूखंड निर्माण करून तो लाटण्याचा प्रकार होतो आहे . या कडे लक्ष वेधून त्यांनी तातडीने कारवाई ची मागणी केली आहे .. या संदर्भात पहा आणि ऐका नेमके उपमहापौर यांनी काय म्हटले आहे …