पुणे-जम्मू च्या आठ वर्षीय असिफाच्या वेदना, यातनांचा विचार करा आणि चला महापौर , सर्व स्तरातील विकृतांना कडक इशारा देण्यासाठी, आय बहिणींच्या सुरक्षेसाठी उपोषण करू या , तुम्ही घ्या पुढाकार ..सर्व पक्ष तुमच्या समवेत उपोषण करतील …असे आवाहन आज कॉंग्रेस चे गटनेते अरविंद शिंदे यांनी मुख्य सभेत बोलताना केले .
असिफा आणि अन्य ठिकाणच्या अत्याचारित महिला मुलींना न्याय देण्यासाठी विकृत गुन्हेगारांना कठोर त्वरित शासन करण्यासाठी पुण्याच्या महापौरांनी राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखांना पत्र पाठवावे असे या वेळी शिंदे यांनी सांगितले.
राजकारण म्हणून आम्ही केले उपोषण कि तुम्ही करायचे … असे प्रकार जर होतात तर मग .. असिफा सारख्या कोवळ्या जीवावर अत्याचार करणाऱ्या नराधमाना शासन करण्यासाठी का उपोषण नको असा सवाल शिंदे यांनी केला . पहा आणि ऐका नेमके शिंदे काय म्हणाले …