पुणे- महापालिकेच्या कारभाराचे हल्ली वाभाडे तरी किती काढायचे … असा प्रश्न लिखाण करताना पडू लागला आहे . आयुक्त कुणाल कुमार यांनी १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर काँक्रीटिकरणाचे काम करू नये असे आदेश काढले होते . आणि आज चक्क एका वृत्तपत्रात भवानी पेठेतील एकाच रस्त्याचे 3 टेंडर ची जाहिरात प्रसिद्ध झाली . बरे नुसती जाहिरात प्रसिद्ध झाली नाही तर प्रत्यक्षात याबाबत या रस्त्यावर या अगोदरच कोणी ठेकेदाराने काम हि सुरु केलेले आहे . रस्ता उखडून ठेवला आहे . आयुक्तांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवून ,टेंडरची जाहिरात आज प्रसिद्ध केली , अन टेंडर येण्यापुर्वीच ठेकेदार ठरला ,कामाची सुरुवात हि झाली …असा अजब गजब कारभार कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज विविध कागदपत्रे सादर करीत उघडकीस आणला आहे . याबाबत त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली असून तातडीने याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे … पहा आणी ऐका नेमके याप्रकरणी बागवे यांनी काय म्हटले आहे .