पुणे- केवळ मतदार ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येणार नाही तर विधानसभा मतदार यादीत नाव असेल तरच महापालिकेसाठी मतदान करता येईल , १ जानेवारी २०१७ ला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदान करता येयील पण सर्वांनी आपापले नाव मतदार यादीत समाविष्ट करवून घ्यावे .तपासून पाहावे . मतदार नोंदणी साठी चे अर्ज एक गठ्ठा पद्धतीने नगरसेवक , वा कोणीही जमा करू शकणार नाहीत .. त्यांच्याकडून अशा पद्धतीने नोंदणी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत . मात्र कुटुंबातील व्यक्ती कुटुंबातील व्यक्तीच्या नोंदणीचा अर्ज दाखल करू शकेल अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी पालिकेच्या मुख्य् सभेत दिली . पहा आणि ऐका नेमकी काय माहिती त्यांनी दिली….