भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कश्याप्रकारे यश मिळाले याचा अभ्यास करा: पराग करंदीकर
पुणे- सन 2017 च्या निवडणुकीत 82 हा आकडा गाठणे आवश्यक असून भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कश्याप्रकारे यश मिळाले याचा अभ्यास करा असा सल्ला महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लक्ष्य 2017’ प्रशिक्षण शिबिर मालिकेअंतर्गत ‘दै. महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी मार्गदर्शन केले.
पराग करंदीकर बोलताना म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘लक्ष्य 2017’ साठी 82 हा आकडा येत्या निवडणुकीत गाठायचा आहे. त्यासाठी पुणे शहरात पोषक वातावरण आहे का हे प्रथम पाहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या कोणत्या उणीवा आहेत त्या कार्यकर्त्यांना ओळखता आल्या पाहिजे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी कचरा, रस्त्यावरील खड्डे, वीज, पाणी या चार समस्या महत्वाच्या असतात. पुणे महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेला नगरसेवक पाच वर्षातील विकासकामे कश्याप्रकारे करून मतदारांना सामोरे जातो, आपल्या प्रभागात कोणकोणते सार्वजनिक कार्यक्रम, उपक्रम राबवितो याकडे नागरिकांचे लक्ष असते. तुमच्या मतदारसंघाबाबत तुम्ही कीती जागरूक आहात या सर्व गोष्टीं अतिशय महत्वाच्या आहेत.
भाजपला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कश्याप्रकारे यश मिळाले याचा अभ्यास करावा. जे मतदारांपर्यंत पोहचू शकत नव्हते ते त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पोचले. पुढील निवडणुक ही याच पध्द्तीची असणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून नागरीकांपर्यत तुम्ही केलेली कामे पोहोचविणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन 10 वर्षात केलेल्या कामाचे अहवाल दिले पाहिजे.त्यांना त्या कामाचे तपशील देता आले पाहिजे.
सोशल मिडीया, वैयक्तिक संपर्क, कार्यकर्त्यांची फळी, आपण केलेली कामे, समन्वय, नियोजन हे खूप गरजेचे आहे. हे शक्य झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसला 82 हा आकडा गाठणे शक्य आहे. त्यासाठी आत्तापासून कामाला सुरुवात करा.