पुणे : हीरे-मोती तुमने छुपाये कुछ हम लोग न बोले
हीरे-मोती तुमने छुपाये कुछ हम लोग न बोले
अब आटा-चावल भी छुपा तो, भूखों ने मुंह खोले
अरे भीख न मांगे,अरे क़र्ज़ न मांगे
भीख न मांगे क़र्ज़ न मांगे
ये अपना हक मांगती है
ये जो पब्लिक है, सब जानती है
ये जो पब्लिक है
ये जो पब्लिक है सब जानती है..
राष्ट्रवादीने आज महापालिकेच्या दारात ‘रोटी ‘ चित्रपटातील या गाण्यासह वादा तेरा वादा ,झुटा है तेरा वादा .. क्या हुवा तेरा वादा आणि भोली सुरत दिल के खोटे नाम बडे और दर्शन छोटे ..अशी गाणी वाजवून त्याबरोबर गाजरे झळकवून भाजपला संगीताच्या लयीतून ..गाण्यांच्या शब्दातून चेहरा दाखविण्याचा प्रयत्न करणारे आंदोलन केले .पक्षाचे शहराध्यक्ष , नगरसेवक चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत पुणे शहराचे स्थान घसरल्याने महापालिकेतील विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपविरोधात आंदोलनाची मालिकाच सुरू केली आहे. ‘पुणे शहर देशातील सर्वोत्तम शहर करू’ या भाजपच्या आश्वासनाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकारचे महापालिकेच्या दारात आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराची घसरण झाली असूून या स्पर्धेत पुणे 37 व्या क्रमांकावर गेले आहे. या स्पर्धेसाठी महापालिकेने वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रचंड तयारी करीत, कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र स्पर्धेत महापालिकेला आपले स्थान टिकविता न आल्याने विरोधक आक्रमक झाले आहे.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि मनसे आंदोलन केले. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आंदोलन करून सत्ताधारी भाजपची कोंडी केली.