‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’च्या वतीने शिवजयंती मिरवणूकीतील स्वराज्य रथांचे स्वागत
पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूकीतील शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी हा स्वागतकक्ष पुणे महानगरपालिका येथे उभारण्यात आला होता.
मिरवणूक मंडळातील पदाधिकाऱ्यांचे श्रीफळ देऊन पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आलेयावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर ,कारण मानकर तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, अशोक राठी, नगरसेवक सचिन दोडके, राकेश कामठे, रुपाली चाकणकर, नीलेश वरे, सुकेश पासलकर, प्रदीप देशमुख, शंकर शिंदे, युसूफ शेख, गणेश नलावडे, सुनिता मोरे महेश हांडे,नितीन राठोड रोहन पायगुडे अरुन गवळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.