पुणे :’पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’ च्या वतीने ‘ पंजाब नॅशनल बँके’ च्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी व त्याला पाठीशी घालणाऱ्या भाजपा सरकारच्या विरोधात आंदोलनाद्वारे जाहिर निषेध करण्यात आला.
पक्षाच्या वतीने आज शहरातील विविध भागात निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रातील हे आंदोलन शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने कर्वे पुतळा, पर्वती विधानसभा मतदार संघाच्या वतीने पुणे सातारा रोड, कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने नाना पेठ, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार येथील पंजाब नॅशनल शाखे समोर सकाळच्या सत्रात आंदोलन झाले.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते चेतन तुपे,माजी उपमहापौर दीपक मानकर, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शशिकांत तापकीर ,माजी स्थायी समिती अध्यक्षा नगरसेवक अश्विनी कदम, कमल ढोले -पाटील, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, माजी उपमहापौर निलेश मगर, , नंदा लोणकर, वासंती काकडे, अशोक राठी, रजनी पांचगे, कलिंदि गोडांबे, रूपाली चाकणकर (शहराध्यक्षा,राष्ट्रवादी महिला काँग्रेस), भोलासिंग अरोरा, भगवानराव वैराट, अनिस सुंडके, चद्रकांत कवडे, जनार्दन जगताप, मुनीर सयद, नरेश जाधव, राहुल तांबे, कुलदीपसिंग दुटेजा, विशाल मोरे ,मंगेश मोरे, विशाल नाटेकर, नितीन रोकडे झेंडे, श्वेता होनराव-कामठे (कार्यअध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस), फारूकभाई इनामदार, नारायण लोणकर, सागरराजे भोसले, भानुदास शिंदे, अतुल तरवडे, विक्रम जाधव, शंतनू जगदाळे, करण कोकणे,तुकाराम शिंदे,कलेश्वर घुले, सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाच्या सायंकाळच्या सत्रात खडकवासला, वडगाव बुद्रुक पूल येथील शाखेसमोर ५. ३० वाजता निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होतेे.