पुणे-राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस वडगाव शेरी मतदार संघाच्यावतीने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते . या आरोग्य शिबिरात ५०० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर व दंत तपासणी करण्यात आली . येरवडा येथील बाबू जगजीवनराम प्राथमिक विद्यालयाजवळील विरंगुळा केंद्रात झालेल्या या शिबिराचे उदघाटन माजी महापौर व नगरसेविका वैशाली बनकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे , राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षा मनाली भिलारे , राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस अक्षदा राजगुरू , राष्ट्रवादी युवती काँग्रेस वडगाव शेरी मतदार संघ अध्यक्षा अश्विनी सावंत परेरा , उपाध्यक्षा गितांजली हेंद्रे सारगे , शैलेश राजगुरू , सुरेखा हेंद्रे , कैलास हेंद्रे , संतोष कांबळे , निता गलांडे , विश्वास खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते .
या शिबिरासाठी सोनाली गाडे , अबोली घुले , प्रगती कवडे , राजलक्ष्मी सारोळकर , सचिन नवघरे , अनिता आल्हाट , संजय चव्हाण , देविका संकपाळ , जबीन शेख , विक्रम गालफाडे , अलका ढगे आदींनी विशेष परिश्रम घेतले .
या शिबिरासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले .