राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
हिराबाग येथील पक्ष कार्यालयात माजी संघटक सचिव सुरेश पवार यांच्या हस्ते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला शहर कार्यकारिणी सदस्य संजय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शंकर शिंदे,विक्रम मोरे, वैभव जाधव, सलमान सय्यद, तुषार मोरे, सुरेश खाटपे, वैभव जाधव, संजय गाडे, बाळासाहेब ढमाले, अविनाश वेल्हाळ, योगेश वराडे, राकेश कामठे हे उपस्थित होते.