सेट परीक्षेतील त्रुटींबाबत समितीच्या अहवालाची माहिती द्या : खासदार वंदना चव्हाण यांचे कुलगुरूंना पत्र
पुणे :
मे महिन्यात सेट परीक्षेत उत्तरपत्रिका बाबत झालेल्या गोंधळासंदर्भात कुलगुरूंनी नेमलेल्या समितीच्या अहवालाचे काय झाले ? असा प्रश्न आज खासदार वंदना चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरूंना विचारला आहे . कुलसचिव शाळीग्राम यांना याबाबतचे पत्र आज देण्यात आले .
या परीक्षेतील त्रुटींमुळे अन्याय झालेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळणार, कँटीन मधील जेवण व्यवस्थेतील सुविधांमधील त्रुटी, विदयार्थ्यांच्या हॉस्टेल सुविधांमधील त्रुटी असे आणि इतर अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी आज दिलेल्या पत्रात विचारले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ऋषी परदेशी आणि अशोक राठी यावेळी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे २५०० विद्यार्थ्यांना अनेक समस्याना सामोरे जावे लागले आहे. तरी आपण याकडे वैयक्तिक लक्ष देऊन पाठपुरावा करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली.
आपण या प्रकरणात योग्य न्याय देऊ शकण्याचे आश्वासन दिल्यास विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने हितकारक होईल, असेही पत्रात म्हटले आहे