पुण्यातील जर्मन कंपन्या शहराच्या पर्यावरण प्रश्नात योगदान देतील : खा. वंदना चव्हाण
पुणे :
पुण्यातील जर्मन कंपन्या या शहराच्या पर्यावरण प्रश्नात योगदान देतील यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन ग्रीन पार्टीच्या संसद सदस्य बार्बेल हॉन यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दिली.
‘क्लायमेट पार्लमेंट फोरम’तर्फे नवीनीकरणीय ऊर्जा या विषयावरील भारतीय संसद सदस्यांच्या जर्मनी अभ्यास दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी बार्बेल हॉन यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान हॉन यांनी हे आश्वासन दिले.
या दौऱ्यात नरेंद्र प्रधान, रजनी पाटील, सुनील सिंघ, भारतेंद्र सिंघ यांचाही समावेश होता.
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी दौऱ्यादरम्यान ‘जर्मन पार्लमेंट’ला भेट, स्वयंपूर्ण ऊर्जा खेड्यांना भेट दिली तसेच ‘ग्रीन पार्टी’ च्या संसद सदस्यांची आणि ‘इंडो जर्मन पार्लमेंटेरियन ग्रुप’च्या सदस्यांची भेट घेतली.