पुणे- येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निअव्द्नुक होत असून या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होवू शकतील असे राजकीय समीक्षकांचे मत आहे.
प्रदेशाध्यक्ष पद साठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे हे देखील या पद साठी इच्छुक आहेत . येत्या २९ एप्रिल रोजी मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात हि निवडणूक होणार आहे. याच दिवशी इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत . हि निवडणूक होताना मागील एका निवडणुकीचा दाखला आता देण्यात येतो आहे , तो म्हणजे मधुकर पिचड हे निवडणूक निर्णय अधिकारी असताना खुद्द शरद पवार यांनी त्यांचीच प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली होती. यावेळी एक हि उमेदवारी अर्ज आला नव्हता आणि हि निवड बिनविरोध करण्यात आली होती .यावेळी देखील अशा पद्धतीने वळसे पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे .