नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाला सोडून नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रवेशानंतर सोमवारी त्यांची पहिली पत्रकार परिषद झाली. सिद्धू म्हणाले, ‘मी जन्मतः काँग्रेसी आहे. ही माझी घरवापसी आहे. माझे अस्तित्व काँग्रेसचेच होते. माझे वडील गदर पार्टीत होते, 40 वर्षे ते काँग्रेसी होते.’ पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग यांच्यावर सिद्धूंनी कडाडून हल्ला केला. बादल परिवाराने संपत्ती गोळा करण्याशिवाय काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
पहचान खो दोगे ,तो बिखर जावोगे नक्की पहा ऐकाच…नवज्योतसिंग सिद्धू (व्हिडीओ नक्की पहा ऐकाच.. )
सिद्धू म्हणाले, आता बादल परिवाराची राजवट उलथवून लावायची आहे. बादलो, सिंहासन खाली करा! अकाली दल कधीकाळी पवित्र जमात होती, आता जायदाद झाली आहे. त्यांच्याकाळात अन्नदाता भिखेला लागला आहे.