पुणे- ज्याला पत्नी मुले, आई वडील ..असा संसार आहे , ज्याला संसाराचा गाडा चालवायचा आहे .. त्याला सरकारच्या निर्णयाच्या झळा हैराण करीत आहेत . नरेंद्र मोदींना हे समजणार कसे ? संसार काय असतो हे ज्याला माहिती नाही त्याच्या हातात देश दिल्यावर काय होणार ? असा झणझणीत सवाल पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी येथे केला .
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात मोदी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले … यावेळी पहा आणि ऐका .. महापौर प्रशांत जगताप नेमके काय म्हणाले ….