पुणे-हडपसर सर्वे नं ४८ (श्री राम चौक मागील बाजूस ) नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे व नगरसेवक घुले यांच्या विकास निधीतुन सुमारे ४ एकर क्षेत्रावर अद्यावत बागेच्या ( गार्डन) उभारणीच्या कामाचे भूमिपूजन काल प्रभागातील जेष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सौ. प्रची आशिष आल्हाट व चिंतामणी नगर, उद्योग नगर, सातव नगर, व काळेपडळ परिसरातील विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.