पुणे : वीजबिलांच्या थकबाकीदारांविरोधात सुरु असलेल्या धडक मोहिमेत या महिन्यात बुधवार (दि. 22) पर्यंत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील 38,764 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
या महिन्यात थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलातील 38,764 थकबाकीदारांचा 11 कोटी 83 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागत आहे. थकबाकीदारांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून राज्यभरात ही महामोहीम सुरु आहे.
पुणे, पिंपरी, लोणावळा, चाकण, तळेगाव आदी शहरांसह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांतही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकबाकीदारांविरोधात सुरु असलेल्या कारवाईची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश असलेली वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
वीजबिल भरणा केंद्ग दि. 25 व 26 रोजी सुरु
थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्ग दि. 25 व 26 मार्चला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. शनिवारी (दि. 25) व रविवारी (दि. 26) सार्वजनिक सुटी असली तरी पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची नामुष्की टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.