पुणे- प्रदूषणाच्या पातळीबाबत पुण्यातही जागृत राहण्याची गरज आहे असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी येथे व्यक्त केले .स्वारगेट आणि नळस्टोप येथे प्रदूषणाने धोक्याची पटली कायमच ओलांडलेली असते मात्र पीएमपीएमएलच्या बसेस बाबत त्यांनी काहीही विधान केलेले नाही .
खासदार अनिल शिरोळे ह्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे एस साळुंखे ह्यांच्या समवेत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर बोलताना सांगितले कि,दिल्लीतील प्रदूषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रदूषणाची सध्याची पातळी व त्यातील संभाव्य वाढ लक्षात घेता उघडयावर जाळला जाणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि रस्ते बांधणीत कमीत कमी कचरा निर्माण होणे हे दोन उपाय प्रामुख्याने करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुणे शहरातील धूलिकण प्रमाण (Suspended Particulate Matter व Respiratory S suspended Particulate Matter) हे सध्या तरी नियंत्रित पातळीत आहेत. परंतु शहरातील स्वारगेट (२४०) आणि नळ स्टॉप चौकात (२००) हेच प्रमाण धोक्याच्या पातळी(१००) ओलांडून पुढे गेले आहे अशी माहिती ह्या आढावा बैठकीत देण्यात आली. बैठकीतील आढाव्यानुसार पुढील कार्यवाही साठी महापौर मुक्ता टिळक ह्यांना कळविले असल्याचे शिरोळे ह्यांनी नमूद केले.