या आमदाराचा टांगा पलटी होणार – वसंत मोरे यांचा दावा (व्हिडीओ)
पुणे- पुण्यातील आठ ही मतदार संघातील भाजपच्या आठ हि आमदारांवर विरोधकांनी टीका केली ,आणि कधी माध्यमांनी देखील टीका केली . पण या मध्ये सर्वाधिक टीकेचे भक्ष्य ठरले ते हडपसर मधील भाजपचे आमदार टिळेकर ; विशेष म्हणजे हि सर्व टीका याच मतदार संघातील त्यांचे विरोधक मनसे चे वसंत मोरे यांनी केली. विरोधकांनी टीका करणे हे स्वाभाविक मानले जाते . पण तसे इथे अजिबात नव्हते . गेली कित्येक महिने नव्हे तर गेली ५ वर्षे म्हणता येईल एवढा काळ मोरे यांनी या आमदारांचा पीछा केल्याचे दिसून आले . या आमदाराच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून त्यांनी अनेक घोटाळे कधी पालिकेच्या सभागृहातून तर कधी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि सोशल मिडिया च्या द्वारे मोहीम च उघडून आणि रस्त्यांवरील आंदोलने ,कार्यक्रम येथून चव्हाट्यावर मांडली .अशा पद्धतीने या तथाकथित आमदारांवर असंख्य आरोप झाले ,आणि कित्येक त्यात गंभीर देखील होते , पण भारतीय जनता पार्टी च्या कोणत्याही छोट्या मोठ्या नेत्यांनी या आरोपांना उत्तरे दिली नाहीत किंवा त्यावर काहीही म्हणणे सादर केले नाही , ना टिळेकर यांनी या आरोपांकडे फारसे लक्ष दिले नाही .टिळेकरांवरील आरोपांना पक्षाच्या पातळीवरहि उत्तरे का दिली गेली नाहीत ? हा प्रश्न असताना अशा आरोपांमुळे येथे पक्षाला काही झळ बसणार आहे कि नाही ? अशा प्रश्नाचाही कधी विचार केला गेल्याचे दिसले नाही .
या विधानसभा मतदार संघातून मोरे यांना निवडणूक लढवायची आहे आणि त्यांना येथून आमदार व्हायची इछ्या जगजाहीर आहे .पण म्हणून या घोटाळ्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल काय हे अर्थात पक्षच ठरविणार आहे .पण मनसे च्या आक्रमक पवित्र्यामुळे हडपसर विधानसभा मतदार संघात जंगी ,वादळी लढत होईल हे स्पष्ट दिसून येते आहे .
कालच्या आपल्या ‘घोटाळ्यांच्या फाईल्सची महापूजा ‘ या आंदोलनात वसंत मोरे यांनी केलेली हि फटकेबाजी निश्चितच भाजपला विचार करायला लावणारी ठरू शकते असे मत व्यक्त होत आहे . पहा मोरे यांचे हे भाषण जसेच्या तसे ……