~ पुढील तीन वर्षांसाठी 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुक
~ महत्त्वाच्या शहरांमध्ये हॅप्पीनेस्टचा ठसा उमटवण्यासाठी विस्तार आणि वाढत्या मध्यम वर्गाच्या गरजा ओळखण्याचा प्रयत्न
मुंबई : महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड (एमएलडीएल), ही महिंद्रा ग्रूपची रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठीची कंपनी आहे. या कंपनीने एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड – 1 (एचडीएफसी कॅपिटल) बरोबर भागीदारी केली आहे, एचडीएफसी कॅपिटल ही एचडीएफसीची प्रमुख गुंतवणूक कंपनी आहे, या भागीदारीद्वारे भारतात परवडणाऱ्या गृहप्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यासाठीचा संयुक्त उपक्रम प्रमुख बाजारपेठांमधील प्रकल्पांद्वारे भारतातील परवडणाऱ्या घरांच्या मागणी-पुरवठ्यातील त्रुटींचा वेध घेईल, यासाठी साधारणपणे 5 ते 10 दशलक्ष स्क्वेअर फुटांचा विकास करण्यात येणार आहे, हॅप्पीनेस्टच्या नावाअंतर्गत प्रकल्पासाठीची निवडक ठिकाणे ठरणार.
प्रस्तावित विकास `महिंद्रा हॅप्पीनेस्ट डेव्हलपर्स लिमिटेड’ (एमएचडीएल) द्वारे विकसित केला जाईल, यासाठी महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड आणि एचडीएफसी कॅपिटल लिमिटेडचे 51:49 असे इक्विटी भाग असतील. संयुक्त व्यासपीठाअंतर्गत पहिला विकास `हॅप्पीनेस्ट – पालघर’ हा असेल, यानंतर चेन्नईत `हॅप्पीनेस्ट आवडी’ आणि मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये `हॅप्पीनेस्ट बोईसर’ असे तीन प्रकल्प चालतील, हे प्रकल्प आर्थिक वर्ष 2018च्या एच2पर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
महिंद्रा लाइफस्पेसेस हॅप्पीनेस्ट ब्रँड प्रकाराद्वारे परवडणाऱ्या गृह प्रकल्पांमध्ये 2014पासून कार्यरत आहे. चेन्नई (हॅप्पीनेस्ट, आवडी) तसेच एमएमआरमधील (हॅप्पीनेस्ट, बोईसर) 1600पेक्षा जास्त युनिट्सचे आतापर्यंत उद्घाटन करण्यात आले आहे, आणि येथे परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प सध्या सुरू आहेत, याशिवाय आतापर्यंत 1000 गृह प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. या प्रक्लपांमधील घरांची किंमत सध्या 17 ते 27 लाख रुपयांमध्ये आहे, आणि याद्वारे धोरणात्मक जोडणी आणि व्हायब्रंट समाजाचे राहण्यासाठीचे पर्याय देण्यात येतात. महिंद्रा लाइफस्पेसेसने शाश्वत शहरी विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून, स्रोतांचा विचार करून आणि पर्यावरणाप्रती गरजांची संवेदनशीलता अबाधित ठेवली आहे, प्रत्येक हॅप्पीनेस्ट प्रकल्प आयजीबीसी प्रमाणित आहे, आणि येथील सुविधा पर्यावरणपूरक आहेत आणि यासाठी ऊर्जासक्षम साहित्य आणि तंत्रज्ञान वापरले जाते, यामुळे संतुलित आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली जगता येते. हॅप्पीनेस्ट आवडी ही पर्यावरणपूरक परवडणाऱ्या घरांसाठीचा भारतातील पहिली आयजीबीसी `प्लॅटिनम’ प्रमाणित प्रकल्प आहे.
हॅप्पीनेस्ट नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा लाभ देते आणि व्हॅल्यू इंजिनिअरिंगद्वारे दर्जाची खात्री देते शिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण केले जातात, आणि किंमतीच्या दृष्टीकोनातून सर्वात फायद्याचे आहे. महिंद्रा लाइफस्पेसेसद्वारे ग्राहकांना या प्रकारातील घरासाठी वित्तीय सेवेसाठी अर्थयंत्रणा निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे; एनबीएफसीच्या ग्राहकांच्या वित्तीय क्षमतांच्या सर्वेक्षणाचा या भागीदारीत समावेश आहे आणि त्यानुसार गृह कर्जे उपलब्ध करून दिली जातात.
एमएलडीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता अर्जुनदास म्हणाल्या की, “भारताच्या रियल इस्टेट उद्योगक्षेत्रामध्ये शहरी पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास याबरोबरच प्रगतीला चालना देणारा प्रमुख घटक म्हणजेच परवडणारी घरे होय. एचडीएफसीबरोबर भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, यामुळे संस्थेच्या अनुभव आणि वचनबद्धतेचा लाभ घेता येणार आहे, परवडणारी घरे विकसित करताना आमच्या ग्राहकांसाठी शाश्वत मूल्य निर्मिली जाणार आहेत, याशिवाय या प्रकारातील मोठ्या प्रमाणावर आतापर्यंत पूर्ण न झालेली मागणी पूर्ण केली जाणार आहे.’’
एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायजर लिमिटेडचे सीईओ विपुल रूंगता म्हणाले की, “निवासी परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प दीर्घकालीन इक्विटीसह पुरवणे हा या व्यासपीठाचा मूळ उद्देश आहे. दीर्घकालीन भांडवलाची कमतरता हा भारतातील कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील प्रगती आणि विकासातील अडथळा आहे. एचडीएफसी कॅपिटलच्या पहिल्या फंडामध्ये, दीर्घकालीन इक्विटीप्रधान भांडलल शहरी आणि निमशहरी भागांच्या विकासासाठी पुरवून या फंडातील त्रुटी भरून काढण्याचे ठरवण्यात आले आहे. परवडणाऱ्या घरांच्या प्रकारात सुयोग्य वाढ अपेक्षित आहे, यासाठी सरकारद्वारे विविध भत्ते आणि साहाय्य केले जात आहे, एमएलडीएलच्या व्यासपीठासह याची आजच्या घडीला गरज आहेच.’’
एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेडबद्दल थोडेसे
एचडीएफसी कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड ही पूर्णपणे हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी आहे, तिच्याद्वारे रिअल इस्टेट प्रायव्हेट इक्विटी फायनान्ससाठी गुंतवणूक सल्लागार सेवा पुरवल्या जातात. ही कंपनी एचडीएफसी कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंड 1 (एच-केअर 1)ची गुंतवणूक व्यवस्थापक कंपनी आहे, तसेच ती प्रकार IIच्या पर्यायी गुंतवणूक निधीसाठी सेबीसह नोंदणीकृत आहे. एच-केअर 1चा जागतिक गुंतवणूकदारांकडील संग्रह 2,700 कोटी रुपये आहे. एच-केअर 1चे प्राथमिक घटक दीर्घकालीन इक्विटी प्रधान भांडवल मध्यम उत्पन्न गटातील विकासासाठी आणि भारतातील परवडणाऱ्या घरांच्या विकासासाठी पुरवणे हे आहे.
एचडीएफसी लिमिटेड :
हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) या भारतातील रिटेल हाउसिंग वित्तसेवेतील प्रमुख कंपनीने आतापर्यंत तब्बल 59 लाख कुटुंबांना स्वतःचे घऱ उभारण्यासाठी मदत केली आहे. एचडीएफसीतर्फे मूल्याधिष्ठित सेवा विशेष प्रशिक्षित आणि अनुभवी व्यावसायिकांकडून दिल्या जात आहेत. एचडीएफसीने सातत्याने ग्राहकप्रधान सेवाच पुरवल्या आहेत.
एचडीएफसीने तांत्रिक साहाय्य आणि आशिया, आफ्रिका, पूर्व युरोप येथील देशांमध्ये विकासासाठी समुपदेशन पुरवणाऱ्या घरांच्या वित्तसेवा कंपनीचे मॉडेलच तयार केले आहे.
एचडीएफसीचे सर्वसाधारण लोन साधारण 26 लाख रुपयांपर्यंत मिळते आणि परवडणाऱ्या घरांच्या प्रकारात सेवा दिली जाते. एचडीएफसीला प्रधान मंत्री आवास योजनेतील (शहरी) क्रेडिट लिंक उपयोजनेअंतर्गत 2017मध्ये उत्तम कामगिरी करणारी संस्था म्हणून पुरस्कृत करण्यात आले आहे.
एचडीएफसी लिमिटेडच्या अधिक माहितीसाठी www.hdfc.com येथे भेट द्या.
महिंद्रा लाइफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल थोडेसे
1994 साली प्रस्थापित झालेल्या, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या विकास व्यवसायातील 19 अब्ज यूएस डॉलर्सच्या महिंद्रा ग्रूपची प्रमुख कंपनी आहे, आणि ही शाश्वत शहरीकरणातील प्रमुख संस्था आहे. भारताच्या प्रमुख आणि रहिवासी निर्मितीतील विकासासाठी कंपनी वचनबद्ध आहे, हा विकास `महिंद्रा लाइफस्पेसेस’ आणि `हॅप्पीनेस्ट ब्रँड्स’अंतर्गत आणि शहरे आणि औद्योगिक समूह `महिंद्रा वर्ल्ड सिटी’ ब्रँड अंतर्गत केला जातो.
ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकता यांच्या वारसा कंपनीकडे आहे, याद्वारेच महिंद्रा लाइफस्पेसेसतर्फे नावीन्यपूर्ण ग्राहकप्रधान उपाययोजना दिल्या जातात. आतापर्यंत कंपनीने 22.85 दशलक्ष स्क्वेअर फुटांचे (2.12 दशलक्ष स्क्वेअर मीटर) काम पूर्ण केले आहे. तसेच भारतातील सात शहरांमध्ये कंपनीचे सध्या सुरू असलेल्या आणि येणाऱ्या अधिवासी प्रकल्पांचे काम सुरू आहे; शिवाय चार शहरांमध्ये एकत्रितपणे राबवल्या जाणाऱ्या विकास/व्यवस्थापनाअंतर्गत 4960 एकरांवर चालू असलेले आणि नव्याने येणारे अनेक प्रकल्प आहेत. भारताच्या पर्यावरणपूरक घरांच्या चळवळीत अग्रणी असलेल्या, महिंद्रा लाइफस्पेसेसचा या प्रकारात आशियात चौथा क्रमांक लागतो, तसेच `2017मध्ये जीआरईएसबी रिअल इस्टेट ईएसजी (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय) गुणांकन’प्राप्त झाले आहे. याशिवाय 2017मध्ये भारतातील मध्यम आकाराच्या कामाच्या ठिकाणांमध्ये 50 उत्तम कंपन्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे, ग्रेट प्लेसेस टू वर्क इन्स्टिट्यूट म्हणून हे गुणांकन मिळाले आहे.
महिंद्रा लाइफस्पेसेससंदर्भातील अधिक माहितीसाठी www.mahindralifespaces.com ; www.mahindraworldcity.com येथे भेट द्या.
महिंद्राबद्दल थोडेसे
महिंद्रा ग्रूप 17.8 अब्ज यूएस डॉलर्सचा विविधांगी कंपन्यांचा ग्रूप असून, त्यांच्यातर्फे शक्तीची गमनशीलता, ग्रामीण समृद्धी आणि शहरी जीवनशैलीचा विस्तार यामध्ये लोकांना सुलभता देणे आणि व्यवसायातील सक्षमता वाढवणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
युटिलिटी वाहने, माहिती तंत्रज्ञान, वित्त सेवा आणि भारतातील व्हेकेशन ओनरशीप आदी महत्त्वाच्या आर्थिक विकास करणा-या क्षेत्रांमध्ये महिंद्राचे कार्य अग्रणी आहे. याबरोबरच महिंद्रा अॅग्रीबिझनेस, अॅरोस्पेस, कॉम्पोनंट्स, कन्स्टिंग सर्व्हिस, डिफेन्स, एनर्जी, इंडस्ट्रीअल इक्विपमेंट, लॉजिस्टीक, रिअल इस्टेट, रिटेल, स्टील, कमर्शिअल व्हेइकल्स आणि दुचाकी उद्योग आदींमध्ये भरीव कार्य महिंद्रा आनंदाने करत आहे.
भारतात मुख्य कार्यालय असलेल्या महिंद्राकडे तब्बल 100 देशांत 200,000 कर्मचारी कार्यरत आहेत.