मंगला मल्टील्पेकस सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांची एक स्वतंत्र सहकारी पतसंस्था स्थापन करून कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा एक चांगला प्रयत्न या माध्यमातून केला आहे .चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी स्वत्रंतपणे पतसंस्था चालविणे हा एक नावीन्यपूर्ण प्रयोग असून तो अन्य ठिकाणच्या चित्रपटगृहातील कामगारांसाठी अनुकरणीय आहे असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे .
मंगला चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांना मंगला सिनेमागृहातील कामगारांची सहकारी पतसंस्था दिवाळीनिमित्त कर्जवाटप करण्यात आले . या कर्जाचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षा खासदार ऍड. वंदनाताई चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले .त्यावेळी त्या बोलत होत्या .
या कामगारांचे नेते भगवानराव वैराट यांनी यावेळी बोलताना पतसंस्था स्थापनेबाबतची भूमिका सांगितली . ते म्हणाले कि , कामगारांना त्यांच्या दैनंदिन अडचणीच्या काळात आर्थिक मदत व्हावी म्हणून हि पतसंस्था स्थापन करण्यात आली असून त्याला मंगला चित्रपट गृहाचे चालक चाफळकर बंधूनी उदार मनाने दहा लाख रुपये बिनव्याजी भांडवल उपलब्ध करून दिले आहे . भविष्यात या पतसंस्थेचा आणखी विकास करून कामगारांचा आर्थिक उत्कर्ष करण्याचा प्रयत्न करू .
या कार्यक्रमास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे , मंगला चित्रपट गृहाचे मालक प्रकाश चाफळकर, अरविंद चाफळकर , कामगार सुरक्षा दलाचे दौंड शाखेचे शांताराम बोराटे , रमेश गायकवाड , संजय कुदळे , विलास भालेराव , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे शहराध्यक्ष मोहम्मद शेख , महादेव मोरे , सूर्यकांत सपकाळ , सुरेखा भालेराव , संतोष जगताप , गणेश लांडगे , संतोष बोतालजी , आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन कामगार सुरक्षा दलाचे सरचिटणीस काशिनाथ गायकवाड यांनी केले तर मंगला सिनेमागृहातील कामगारांची सहकारी पतसस्थेचे अध्यक्ष भाऊ कसबे यांनी आभार मानले .