पुणे-जनसेवा प्रतिष्ठान ,घोरपडी , च्या वतीने दरवर्षी गणेउत्सव देखावा स्पर्धेचे आयोजन केले जाते या स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीक पत्रक प्रदान केले जाते तसेच विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान केले जातात या वर्षी या स्पर्धेत सहभागी १५१ मंडळाचा सन्मान व १४ विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडलाप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पुण्यातील नामवंत गणेशोउत्सव मंडळांच्या अध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येते तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कलाकारानंच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात येते या वर्षी मनाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष मा. प्रविण परदेशी यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत पाचारणे, पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका लताताई धायरकर, उद्योजक नानासाहेब अबनावें, उद्योजक राजेश पवार चीफ एकसुकेटीव्ह ऑफिसर श्री मोहन दुधाने, चित्रपट दिग्दर्शक सुवदन आंग्रे यांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आले
या मंडळांना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्तावना सौ प्रिया खैरे यांनी केले परीक्षक म्हणून श्री संतोष टोणपे तर सूत्र संचालन उपेंद्र शितुत यांनी केले जनसेवा प्रतिष्टान चे अध्यक्ष व गणेशोउत्सव स्पर्धेचे आयोजक श्री रविंद्र खैरे यांनी आभार मानले
पारितोषिक विजेते मंडळे पुढील प्रमाणे
सहभागी सर्व १५१ मंडळांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीक पत्रक
विद्युत रोषणाई –
प्रथम क्रमांक – ओंसई मित्र मंडळ,
दुतिय क्रमांक – गजराज मित्र मंडळ ,
तृतीय क्रमांक – संतोष मित्र मंडळ
हालता देखावा –
प्रथम क्रमांक – क्रांती मित्र मंडळ-घोरपडी ,
दुतिय क्रमांक – गोदावरी टेरेस मित्र मंडळ,
तृतीय क्रमांक – प्रशांत मित्र मंडळ,
सुबक सुंदर गणेशमूर्ती –
प्रथम क्रमांक – शिव मित्र मंडळ,
दुतिय क्रमांक- क्रांती मित्र मंडळ -मुंढवा,
तृतीय क्रमांक – उमेश मित्र मंडळ,
जनजागृती जनसेवा देखावा –
प्रथम क्रमांक -श्रीमंत श्री, रंगविलास तरुण मित्र मंडळ – कोरेगाव पार्क,
दुतिय क्रमांक – नटराज मित्र मंडळ,
तृतीय क्रमांक – गणराज मित्र मंडळ जहांगीर नगर ,
आदर्श मंडळ –
प्रथम क्रमांक – अखिल गणेशबाग मित्र मंडळ,
उत्कृष्ट ढोल ताशा पथक –
प्रथम क्रमांक – एक दिल ढोल ताशा पथक मुंढवा