पुणे- ईदगाह ट्रस्टच्यावतीने शीख बांधवानी माणुसकीच्या नात्याने बर्मा येथे मुस्लिम बांधवांना केलेल्या मदतीबद्दल ज्ञानी अमरजितसिंग , हरभजन सिंग , मनजितसिंग विरदी , नेपालसिंग कल्याणी , अमरजितसिंग परिहार , देवेंद्रर सिंग , इंद्रजितसिंग ऑबेराय याना शाल व पुष्पगुछ देउन आभार मानण्यात आले .
पुणे कॅम्पभागातील गोळीबार मैदानावर ईदगाह मैदानावर ईदगाह ट्रस्टच्यावतीने या प्रार्थनेचे आयोजन केले होते .त्यावेळी हा कार्यक्रम झाला . म्यानमार मधील बर्मा येथे येथे मुस्लिम बांधवांवर होणाऱ्या हल्ले होत असताना शीख बांधवानी त्याठिकाणी अन्नदान करून मोठी मदत केली . त्यामुळे मुस्लिम बांधवानी शीख बांधवांचे आभार मानले . यावेळी जामा मस्जिदचे मौलाना अय्युब अश्ररफी यांच्या मार्गदर्शनाखाली हि सामूहिक प्रार्थना झाली . यावेळी मौलाना कलिमुद्दीन यांनी देखील प्रार्थना केली .
यावेळी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त झैनुल काझी , मुस्ताक अलबुशरा , अमीन शेख , अहमद सय्यद , मोहम्मद हुसेन शेख , सरफराज शरीफ , मोइननुद्दीन शेख , वाहिद बियाबानी , अझीम गुडाकूवाला , इसाक चावीवाले , मुस्ताक पटेल , साजिद सय्यद , मुनावर खान , जावेद खान , सादिक लूकडे , ऍड. अयाज शेख व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले .