पुणे-मदर मेरी जन्मोत्सवानिमित्त पुणे कॅम्प भागातील शरबतवाला चौकाजवळील दस्तूर मेहेर रोडवरील नवनिर्माण मंडळाच्यावतीने मदर मेरी यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली . हि मिरवणूक दस्तूर मेहेर रोड , बुटी स्ट्रीट , पारशी अग्यारी , साचापीर स्ट्रीट , शरबतवाला चौक या मार्गावरून काढण्यात आली . सर्व धर्म समभाव या पध्दतीने नवनिर्माण मंडळाच्यावतीने गणेशोत्सव , ईद आणि मदर मेरी जन्मोत्सव असे सर्व धार्मिक सण उत्सव आम्ही सर्व धर्मीय लोक एकत्रित येऊन साजरा करतो . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जेम्स यांनी दिली . या जन्मोत्सवासाठी रे फर्नाडिस , परेश गायकवाड , स्टेव्हली फ्रान्सिस , उमेश फडतरे , रुपेश बांदोडकर , शब्बीर राईटर , हुसेनी राईटर , इम्रान सरकार आदींनी विशेष परिश्रम घेतले .
सोलापूर बाजारमध्ये अवर लेडी ऑफ गॉड हेल्थच्यावतीने मदर मेरीच्या प्रतिमेची फुलांची सजावट केली होती . दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने मदर मेरीच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती , अशी माहिती विजय अँथोनी यांनी दिली . या धार्मिक कार्यक्रमासाठी रॉबिन मदाजोरम , अजय वाघमारे , विजय राजगुरू , ऑगस्टीन सायमन मेलसीन दास , राजू रिठे , अलशेस प्रगासम , विशाल गायकवाड , डॉनेल्ड डॅनियम आदींनी विशेष परिश्रम घेतले .
घोरपडी बाजार येथे अवे मेरी ख्रिश्चन यंग बॉयजच्यावतीने मदर मेरीच्या प्रतिमेची विद्युत रोषणाईच्या बग्गीमध्ये सजावट करून फेरी काढण्यात आली . अवे मेरी ख्रिश्चन यंग बॉयजच्या जॅक्सन अँथोनी , निवास लादे , डॉमनिक अँथोनी , ऑलॉन अंब्रोस , सेल्वराज मुदलियार , अमित जाधव , कनय्या अँथोनी , ट्रेवोर अँथोनी आदींनी विशेष परिश्रम घेतले . सेंट जोसेफ चर्च , घोरपडी बाजार , फिलिप्स चाळ , तालीम चौक , रेल्वे कॉलनी , आगवाली चाळ आदी भागात मिरवणूक काढण्यात आली .
वानवडी बाजारमधील मदर मेरीच्या प्रतिमेभोवती भव्य विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला होता . यावेळी मदर मेरीची प्रतिमेची मिरवणूक वानवडी बाजारमधील चर्चमधून गिरमे शाळा , महादजी शिंदे शाळा , वानवडी बाजार पोलीस चौकी ,वानवडी बाजारमधून काढण्यात आली . यामध्ये फादर विल्फ़्रिड डिसोझा , टोनी बर्नाट , मनी पॉल , मॅथ्यू परेरा , सचिन मथुरावाला , विनोद मोगरे , सुरज लाळगे , हमीद शेख राजू ऑगस्टीन सेल्वराज , आरोके स्वामी सहभागी झाले होते . यावेळी केक वाटप करण्यात आले .