पुणे-सॅनेटरी नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यान देण्यात आले . या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थीनीना वर्षभराचे सॅनेटरी नॅपकिन्स मोफत वाटप करण्यात आले .
वर्ल्ड कार्पोरेट सोशल रिस्पॉंबिलिटी डे दिवशी मुंबई येथे हॉटेल ताज मध्ये झालेल्या जागतिक परिषदेमध्ये युग फाऊंडेशन या पुण्यातील एकमेव सामाजिक संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
गेली दोन वर्षांपासून हे अभियान राबविण्यात येत असून १००० मुलींना एक लाख सॅनेटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले . हे सामाजिक अभियान यशस्वी करण्यासाठी युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल जेधे, विश्वस्त परी हमदुले , प्रतीक्षा चरण , गोपी कसोटे , ऍड. राहुल बालगोहिरे , मयुर चव्हाण , मिझबाह शरीफ , सिध्दांत सारवान , अक्षय चरण , तिरुपती रेड्डी , निकेत चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले .
जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती करण्यात आली . सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबद्दल मुली, महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे त्यांना जंतुसंसर्गाची बाधा होते. सॅनेटरी नॅपकिन विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने अनेक मुली-महिलाही कपड्यांचा वापर करतात. पुणे येथील ‘ युग फाऊंडेशन’च्या वतीने याच अडचणींवर मात करण्यासाठी सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविले . मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी याविषयी मार्गदर्शन या सामाजिक उपक्रमात राबविण्यात आले .