पुणे-घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील नवचैतन्य हास्य योग्य परिवार जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास विठ्ठल काटे , नगरसेवक धनराज घोगरे , महेश पुंडे , दीपक गुरुजी , प्रकाश अरगडे , नीलिमा चव्हाण , सुशीला अरगडे , माधवी अरगडे, शिला मोरे , सुमित्रा शिवलकर , सीमा वैष्णव , हेमा उणेचा , बापू देडगे , गौतम रासकर, राधेश्वर प्रसाद वर्मा , मालती भोसले , टायगर पिल्ले , वासुदेव दासवानी , धनश्री जगताप, आदी मान्यवर व अन्य सदस्य उपस्थित होते . यावेळी हास्य या विषयावर मार्गदर्शन तसेच हास्याचे प्रकार प्रात्यक्षिके सादर करण्यात आली . आधुनिक महिलांच्या मनातील जात्यावरच्या ओव्या आणि खंडेरायाचे लगीन हे नृत्य सादर करण्यात आले . नवचैतन्य हास्य योग्य परिवार जयवंतराव ससाणे उद्यान हास्य योग संघाचे विभाग प्रमुख प्रकाश अरगडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले .