पुणे-युग फाउंडेशनच्यावतीने वानवडी़ भैरोबानाला येथील विठ्ठलराव शिवरकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थिनींना ३६०० सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करुन जागृती अभियान राबविण्यात आले.
या वेळी युग फाउंडेशनचे अध्यक्ष: कुणाल जेधे, संस्थापक: कणव चव्हाण व फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रतीक्षा चरण,राहुल बालगोहिरे, गोपी कसोटे, परी हमदुले, विकास कसोटे, कैझ होडीवाला, मिस्बाह शरीफ, सिद्धांत सारवान तसेच विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक लघु वाघुले, दिपा व्यवहारे,नंदिनी गायकवाड, दिपाली जाधव आदि मान्यवर उपस्थित होते
युग फाऊंडेशनचे समनव्यक कनव चव्हाण यांनी सांगितले कि , युग फाऊंडेशन शाळांमध्ये मुलींमध्ये सेनेटरी नॅपकिन वापरण्याबाबत जागरुकता अभियान राबवित आहे . त्यासाठी शॉर्ट फिल्म दाखविण्यात येते . त्यामध्ये सेनेटरी नॅपकिन वापरण्याबाबतचे महत्व सांगण्यात आले . तसेच सेनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येते.
विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक लघु वाघुले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परी हमदुले यांनी केले तर आभार युग फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल जेधे यांनी मानले .