पुणे-भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त हडपसर वानवडी काँग्रेस कमिटीच्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुलतान खान , विजय जाधव , रशीद खिजर , शाम सहानी , शंभू जांभुळकर , अमीन शेख , हसन कुरेशी , अकबर शेख , नूर शेख , माजी नगरसेविका पार्वती भडके , अभिजित शिवरकर , अशफाक शेख , रे फर्नांडिस , प्रकाश पवार , अल्ताफ शेख , असिफ शेख , दिनेश गिरमे , बाबुराव मोरे, मिना हुबळीकर , गणेश फुलारे ,स्वप्नील डांगमाळी , अजित ससाणे , रेहमान शेख आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले तर आभार अभिजित शिवरकर यांनी मानले .
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शालोम ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने कोरेगाव पार्कमधील मौलाना आझाद स्मारकमध्ये त्यांच्या प्रतिमेस शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोपर राजमनी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी , पुणे धर्मप्रतांचे प्रमुख थॉमस डाबरे , पीटर डिक्रूज , येसू नंदन , फादर विल्फ्रेस फर्नाडिस , अँथोनी पिल्ले , विल्सम डॅनियल व डेव्हिड दास आदी मान्यवर उपस्थित होते .
आझाद यांच्या जयंतीनिमित्त बजमे रेहबर कमिटीच्यावतीने कोरेगाव पार्कमधील मौलाना आझाद स्मारकमध्ये त्यांच्या प्रतिमेस बजमे रेहबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी शाम सहानी , भगवान वायाळ , हसन रंगरेज , असिफ शेख , अमजद अबू शेख , इरफान मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते .