पुणे-केंद्र सरकारने कर्जमाफी सन २००८ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या काळातील कर्जमाफी खरी कि खोटी ?असा सवाल उपस्थित करत याबाबतच्या कॅग अहवाल संसदेत सादर प्रमाणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व कर्जमाफी प्रकरणी पात्र , अपात्र , निकष , कर्जमाफी खरी किंवा फसवी /खोटी , एकूण व प्रकरण परत्वे रक्कम याची सखोल सी . बी . आय . चौकशी व्हावी व अहवाल मिळावा या मागणीसाठी पुणे विकास आघाडीचे अध्यक्ष चंदन सोंडेकर यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले .
केंद्र सरकारने कर्जमाफी सन २००८ मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कर्जमाफी खरी कि खोटी ? असा सवाल उपस्थित करून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची कृषी कर्जमाफीची सी . बी . आय . चौकशी व्हावी व अहवाल मिळावा . विविध कार्यकारी सोसायटी शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील गैरकारभार , अतिक्रमण , गैरव्यवहार , लेखापरीक्षण न करणे , राजकीय , गावगुंडी असभ्य व कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन , खाजगी सावकार प्रमाणे नियम डावलून व नियमाप्रमाणे अर्ज न स्वीकारणे , एन ओ सी न देणे गलथान कारभारामुळे तात्काळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करावी . पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोरेगाव भिमा संपूर्ण कर्ज प्रकरण , दप्तर तपासणी , सर्व कर्ज खाते , बँक खाते तपासणी व चौकशी करावी . थकबाकीदार यादीत नाव नसताना व कोणतीही कार्यवाही न करता लेखी मागणी करूनही थकबाकी नसल्याचा दाखल न दिल्याने नुकसान भरपाई संबंधिताकडून वसुली करून मिळावी . या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन चालूच राहील असे पुणे विकास आघाडीचे अध्यक्ष चंदन सोंडेकर यांनी सांगितले .