पुणे-आम आदमी पार्टी व शेठ ताराचंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते . पुणे लष्कर भागातील बाबाजान चौकातील तेलगू हॉलमध्ये झालेल्या आरोग्य शिबिराचे उदघाटन आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा निरीक्षक ऍड विकास साबळे व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिनचे सदस्य डॉ. अनुपमा शिंपी यांच्याहस्ते करण्यात आले .
या शिबिराचे आयोजन आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते एस. एम. अली , संदेश दिवेकर , आनंद अंकुश , राजेश चौधरी , साजिद कुरेशी , किशोर मुजुमदार , इफ्तेखार खान , हमीद शेख ,संदीप सोनवणे , मनोज थोरात , सुभाष कारंडे , सुनील कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले . यावेळी स्फुरलू फाऊंडेशनच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या गीता बोरा यांनी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले .
या शिबिरासाठी डॉ. अनुपमा शिंपी , डॉ . नंदन देवरे , डॉ. अभिनव मुळे , डॉ. सुप्रिया पवार , डॉ. ऋतुजा कणसे आदी वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले . या शिबिरात रक्तदाब , रक्त शर्करा , किडनी व लिव्हरचे आजार असलेले रुग्ण आढळले . तसेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले . मोफत औषधें वाटप करण्यात आले .