‘संगीत बाल दरबार’ या संगीत नाटकाला उत्कृष्ठ नाटकाचा तृतीय पुरस्कार
‘आकाशवाणी पुणे’ च्या बालोद्यान कार्यक्रमात झाली निवड
21 जानेवारी रोजी प्रसारित होणार
पुणे :
‘संगीत बाल दरबार’ या संगीत नाटकाला उत्कृष्ठ नाटकाचा तृतीय पुरस्कार मिळाला आहे. डॉ. बाळकृष्ण दामले दिग्दर्शित आणि ‘मीडिया मॅजिक इन्स्टिट्युट’च्या वतीने सादर करण्यात आलेल्या या नाटकाची ‘बालोद्यान’ या आकाशवाणी, पुणे वरील कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार पुणे येथे आयोजित ‘चिल्ड्रन्स् थिएटर फेस्टिव्हल’ मध्ये प्रदान करण्यात आला. हा फेस्टिव्हल पुणे -नगर येथे झाला.
यामध्ये सर्वोत्तम उदयोन्मुख अभिनेता – सिद्धार्थ बाळकृष्ण दामले, सर्वोत्कृष्ट नायिका (तृतीय क्रमांक)- सुखदा बाळकृष्ण दामले, सर्वोत्तम वेशभुषा – मोहिनी बाळकृष्ण दामले यांना पारितोषिके मिळाली. हे संगीत नाटक दीप्ती असावडेकर यांनी लिहीलेल्या ‘आमचं पण ऐका ना’ या काव्य पुस्तकावर आधारित आहे.
हे संगीत नाटक आकाशवाणी, पुणे च्या ‘बालोद्यान’ कार्यक्रमासाठी निवडण्यात आले असून, हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता प्रसारित होणार असल्याची माहिती या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिली.
या नाटकाची गीते संगीता असावडेकर यांची असून, संगीत शुभदा आठवले यांचे आहे. या नाटकामध्ये सिद्धार्थ दामले, सुखदा दामले, योगेंद्र साने, सिद्धार्थ करंदीकर, शार्दुल असावडेकर, कस्तुरी कुलकर्णी, रावती गंधेकर आणि इशान खाडीलकर यांनी अभिनय केला आहे. संगीतकार स्वानंद करंदीकर आणि संगीता असावडेकर असून, प्रकाश योजना अभिषेक रत्नपारखी यांची आहे.