पुणे ः भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज-बेंझ हिने आज ‘विशबॉक्स’ नावाची गाडी खरेदीसाठी ग्राहकांना आर्थिक सुविधा देणारी योजना सादर केली. या योजनेत काही अद्वितीय व नावीन्यपूर्ण असे आर्थिक प्रस्ताव देऊन ग्राहकांना त्यांच्या आवडीची, स्वप्नातील मर्सिडीझ बेंझ कार खरेदी करण्यास कंपनीने प्रोत्साहन दिले आहे. या खास योजनेमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास वाढेल व त्याद्वारे बाजारपेठेत अधिकाधिक व्यवहार होतील, अशी मर्सिडीझ बेंझ कंपनीला आशा आहे.
‘की-टू-की चेंज’, ‘25-25-25-25’, ‘झीरो डाऊन पेमेंट’, ‘स्टार अॅजिलिटी+’ आणि ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा’ इत्यादी पाच प्राथमिक वैशिष्ट्यांसह विशबॉक्स ही योजना नाविन्यपूर्ण आणिग्राहकानुरूप अशी मोबिलिटी सोल्यूशन्स कंपनी देऊ करते.
मर्सिडिज-बेंझ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी मार्टिन श्वेंक याप्रसंगी म्हणाले, ‘’मर्सिडीज बेंझमध्ये आम्ही भारतीय ग्राहकांची मानसिकता लक्षातघेतली आहे आणि त्यानुसारच त्यांना उत्कंठा वाटेल, अशा स्वरूपाची खास योजना आम्ही आणली आहे. वाहन उद्योगात प्रथमच सादर होणारी काही वैशिष्ट्ये या योजनेत आहेत. कार खरेदी करताना ग्राहकांना सोयीच्या होतील अशा सवलती या निमित्ताने देऊन त्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या नावीन्यपूर्ण आणि स्मार्ट अशायोजनेतून आम्ही सध्या बाजारपेठेत समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करीत आहोत आणि आमच्या ग्राहकांना कार खरेदीच्या त्यांच्या निर्णयांमध्ये मदत करीत आहोत. यायोजनेतील वैशिष्ट्यांचा ग्राहकांना निश्चितच चांगला उपयोग होईल आणि ही बाब बाजारपेठ विकसित होण्यास सहाय्यभूत ठरेल, असा आमचा विश्वास आहे.’’
‘’आमच्या मोटारींच्या सर्व श्रेणींमध्ये बीएस-6 हे पर्यावरणविषयक मापदंडाचे निकष लागू करण्याची आमची प्रक्रिया सुरू आहे. आजपर्यंत आम्ही ही प्रक्रिया 60 टक्के पूर्ण केलीअसून येत्या सप्टेंबर 2019 पर्यंत ती 80 टक्के इतकी पूर्ण होईल. एप्रिल 2020 पर्यंत आमचा संपूर्ण पोर्टफोलिओ बीएस-6 ने परिपूर्ण झालेला असेल, याची आम्ही ग्वाही देतो,’’ असेहीश्वेंक यांनी नमूद केले.
विशबॉक्स मोबिलिटी सोल्युशनसची प्रमुख वैशिष्ट्ये ःकीटूकी चेंज ः ही एक अनोखी योजना आहे. यामध्ये ग्राहकाला चार वर्षांच्या कालावधीत दोन मर्सिडीज बेंझ कार बाळगता येतील. जीएलई आणि जीएलएस एसयूव्ही या मॉडेलवरही योजना लागू असेल. या योजनेनुसार ग्राहकाला कोणतीही अतिरिक्त किंमत न देता ते त्याची कार दोनदा अपग्रेड करण्याची संधी मिळेल आणि त्यातून त्याला अत्याधुनिकस्वरूपाची कार नेहमीच बाळगता येईल.
25-25-2525 ः या वैशिष्ट्यानुसार ग्राहकाला डाऊन पेमेंटची आणि लगेच भराव्या लागणाऱ्या ईएमआयची चिंता करावी न लागता, मर्सिडीज बेंझ कारची मालकी मिळवता येईल. यामध्ये ग्राहकाने गाडी घेतेवेळी तिच्या किमतीच्या 25 टक्के इतकी रक्कम द्यायची आहे व उर्वरित रक्कम तीन वार्षिक हप्त्यांमध्ये फेडायची आहे.
झीरो डाऊन पेमेंट ः मर्सिडीज बेंझ घेताना ग्राहकाला सुरुवातीस जी अडचण भासते ती असते डाऊन पेमेंटची. अनेकदा कारवरील मार्जिन, कर आणि विमा यांच्यासह हे डाऊन पेमेंटकारच्या किमतीच्या 40 टक्के इतके भरते. झीरो डाऊन पेमेंटमध्ये ग्राहकाला केवळ रोड टॅक्स भरावा लागतो आणि उर्वरित रक्कम कमी व्याजदराच्या साठ महिने मुदतीच्याकर्जामध्ये रूपांतरित होते.
स्टार एजिलिटी प्लस ः ग्राहकांना भराव्या लागणाऱ्या ईएमआयमध्ये तब्बल 40 टक्क्यांची सवलत तसेच गाडीची देखभाल, वॉरंटी आणि खात्रीलायक बायबॅक या सुविधा असे यायोजनेचे वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ सी-क्लास हे मॉडेल तीन वर्षांच्या कर्ज सुविधेसह येणाऱ्या ग्राहकाला सर्वसाधारणपणे 1,35,000 रुपये इतका इएमआय (देखभालीच्यासुविधांशिवाय) लागू होतो. नव्या स्टार एजिलिटी प्लस या योजनेनुसार, हा इएमआय 82,000 इतकाच घेण्यात येतो. तसेच यामध्ये देखभालीचा खर्चही समाविष्ट आहे. यामुळेग्राहकांची दरमहा 53,000 रुपये # इतकी बचत होते.
कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स ः या योजनेतून ग्राहकाला दोन वर्षांचा विमा मोफत उपलब्ध होईल. यामध्ये मोटारीच्या उच्च ज्ञात मूल्यावर कमी इक्विटीची गरज लागून ग्राहकाचाकमी खर्चाचा फायदा होईल.
मर्सिडीज बेंझ ही कंपनी तिच्या ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने व तशीच सेवा देण्याबाबत प्रसिद्ध आहे. जेडी पॉवर ग्राहक समाधान निर्देशांकामध्ये (सीएसआय) आणि लक्झरी कारक्षेत्रात विक्री समाधान निर्देशांकामध्ये मर्सिडीज बेंझला उच्च श्रेणी मिळालेली आहे. ग्राहककेंद्री योजना व उपक्रम आखून ग्राहकाला कार खरेदी करताना येणाऱ्या अडचणींचे प्रमाणकमी करून त्याच्या मर्सिडीज बेंझ खरेदीच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचा कंपनीचा नेहमीच प्रयत्न होता व यापुढेही राहील.